महाड बस स्थानक ते राष्ट्रीय महामार्ग मार्गावरील खड्डेमय रस्त्यावर पावसाळ्यात सुरू असलेले दुरुस्तीचे काम महाराष्ट्र ताज्या बातम्या

₹2.5 कोटींच्या रस्त्यावर दोन वर्षांत खड्डे; भर पावसात महाड नगरपालिकेची ‘मलमपट्टी’!

महाड बस स्थानक–राष्ट्रीय महामार्ग मार्गाची दुरवस्था; अपूर्ण गटारांमुळे पाणी रस्त्यावर, नव्या काँक्रिट रस्त्यावरील तड्यांमुळेही कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न महाड : कोकणातील महत्त्वाचे मध्यवर्ती आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाड एसटी बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवघ्या दोन वर्षांत खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून करण्यात आलेल्या डांबरीकरणानंतर आता भर पावसात रेडिमेड डांबरमिश्रित साहित्य […]