ताज्या बातम्या महाराष्ट्र

नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी गोळ्यांच्या विक्रीचा मुद्दा विधानसभेत; चित्रा वाघ यांचे सरकारला प्रश्न

मुंबई : नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी गोळ्यांच्या बेकायदेशीर विक्रीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चित्रा वाघ यांनी या प्रकरणी सरकारला काही महत्त्वाचे प्रश्न विचारले. पुणे खडकपाडा पोलिसांनी समीर हमीद शेख आणि सुनील गजानन शर्मा या दोघांना अटक केली असून, त्यांच्या कोंढवा येथील घरावर टाकलेल्या छाप्यात मनोरुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या सुमारे ६९०० औषधी गोळ्या जप्त करण्यात आल्या. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना युद्धजन्य परिस्थितीत विशेष अनुदान देणार का? जयंतराव पाटील यांचा सरकारला सवाल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे विधिमंडळ पक्षनेते जयंतराव पाटील यांनी आज विधानसभेत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींचा मुद्दा उपस्थित केला. लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून त्यांनी युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीवर झालेल्या परिणामांकडे सरकारचे लक्ष वेधले. जयंतराव पाटील म्हणाले की, अफगाणिस्तानमार्गे येणाऱ्या मालावर बंदी घालण्यासाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी सात–आठ महिन्यांपूर्वी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी पत्रव्यवहार केला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

बुरुड समाजातील बांबू कारागिरांना कच्चा माल उपलब्ध करणार; अडथळा आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई : वनमंत्री गणेश नाईक

मुंबई: राज्यातील बुरुड समाजातील बांबू कलाकार आणि कारागिरांना कच्चा माल उपलब्ध करण्यात अडथळे निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच या समाजातील युवकांना बांबू उत्पादनातून कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मंत्रिमंडळाची विशेष समिती नियुक्त करून धोरण तयार केले जाईल, असे स्पष्ट उत्तर वनमंत्री Ganesh Naik यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला दिले. ही लक्षवेधी सूचना सदस्य Rajkumar Badole यांनी मांडली होती. ज्येष्ठ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पुण्यातील रस्ते-पदपथ अतिक्रमणावर कठोर कारवाईचे निर्देश : मंत्री शंभूराजे देसाई

मुंबई: ‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील मुख्य व अंतर्गत रस्ते तसेच पदपथांवरील अतिक्रमणामुळे वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे मंत्री Shambhuraj Desai यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात स्पष्ट केले. सदर लक्षवेधी सूचना सदस्य Bapusaheb Pathare यांनी उपस्थित केली होती. पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी होत असून विद्यार्थी प्रशिक्षण व […]