राष्ट्रवादी काँग्रेसची पिंपरी-चिंचवड कार्यकारिणी बरखास्त; निरीक्षक सुनील माने यांच्याकडे नव्या कार्यकारिणीची जबाबदारी
पिंपरी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे संघटन तळागाळापर्यंत अधिक मजबूत, गतिमान आणि सक्षम करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहर व जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हा निर्णय घेतला असून, पिंपरी-चिंचवडचे पक्षनिरीक्षक सुनील माने यांच्याकडे नवीन कार्यकारिणी गठित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच […]
