महाराष्ट्र ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसची पिंपरी-चिंचवड कार्यकारिणी बरखास्त; निरीक्षक सुनील माने यांच्याकडे नव्या कार्यकारिणीची जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पिंपरी चिंचवड कार्यकारिणी बरखास्त, सुनील माने यांच्याकडे जबाबदारी

पिंपरी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे संघटन तळागाळापर्यंत अधिक मजबूत, गतिमान आणि सक्षम करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहर व जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हा निर्णय घेतला असून, पिंपरी-चिंचवडचे पक्षनिरीक्षक सुनील माने यांच्याकडे नवीन कार्यकारिणी गठित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत शशिकांत शिंदे, पिंपरी-चिंचवडचे पक्षनिरीक्षक सुनील माने आणि स्थानिक पदाधिकारी यांच्यात पिंपरी-चिंचवडमधील पक्षाच्या विद्यमान कार्यकारिणीबाबत सविस्तर चर्चा झाली.

या चर्चेनंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड शहर व जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी गठित करण्याचा निर्णय घेतला. याबाबत पक्षाने अधिकृत पत्रक जारी केले आहे.

खासदार अमोल कोल्हे यांच्याशी सल्लामसलत करून, तसेच आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर नवीन कार्यकारिणी तयार करण्याची जबाबदारी पक्षनिरीक्षक सुनील माने यांच्याकडे देण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणी गठित करताना महिला, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक, ओबीसी आणि इतर सर्व घटकांतील निष्ठावंत व सक्रिय कार्यकर्त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार प्रतिनिधित्व दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे पक्षात दीर्घकाळ काम केलेल्या नेत्यांचा अनुभव आणि तरुण कार्यकर्त्यांची ऊर्जा यांचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न नवीन कार्यकारिणीत केला जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहर व जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ आणि प्रभागांतील प्रमुख पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून, खासदार अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या कार्यक्रम, आंदोलन आणि जनसंपर्क मोहिमांमध्ये सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांना नवीन कार्यकारिणीत स्थान दिले जाणार असल्याचे पक्षनिरीक्षक सुनील माने यांनी सांगितले.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात