दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न; आणखी 19 तालुक्यांना दुष्काळी सवलतींचा दिलासा
पंचनामे अचूक आणि तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश; कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारी गेल्यास कारवाईचा इशारा मुंबई — राज्यातील दुष्काळी संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळावी यासाठी पंचनाम्यांची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याचवेळी दुष्काळी परिस्थिती असूनही ‘ट्रिगर-वन’च्या निकषाबाहेर राहिलेल्या तालुक्यांचाही प्रत्यक्ष परिस्थिती, पंचनामे आणि आणेवारीच्या आधारे विचार करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे, अशी माहिती महसूल […]
