ताज्या बातम्या महाराष्ट्र

ओनरशिपमधील इमारतींच्या पुनर्विकासाला विरोध केल्यास सभासदाची हकालपट्टी !

अधिनियमात सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय मुंबई महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्टमधील (Maharashtra Apartment Ownership Act) नोंदणी केलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (cabinet decisions) घेण्यात आला. यानुसार पुनर्विकासास विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भातील अध्यादेश स्वरुपात विधेयक आणण्यात येईल. […]