आक्वा लाईनचा प्रवास की शिक्षा? दोन तासांच्या खोळंब्याने मुंबईकर त्रस्त
By दिपक कैतके मुंबई: “कोंबडीला खुराड्यात कोंडावे, तशी आमची अवस्था झाली होती,” अशा संतप्त शब्दांत प्रवाशांनी आज मुंबई मेट्रो-३ (आक्वा लाईन) मधील अनुभव मांडला. धारावी स्थानकावरून दुपारी सुमारे १२.४५ वाजता सुरू झालेला प्रवास चर्चगेट (मंत्रालय) परिसरापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल दोन तास लागल्याने प्रवाशांचा संयम अखेर संपल्याचे चित्र पाहायला मिळाले. यातील सुमारे दीड तास मेट्रो भुयारी बोगद्यातच […]
