कुर्ल्यातील रेल्वे जमिनीवरील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी हालचाली; शिंदेंची रेल्वेमंत्र्यांशी चर्चा
रेल्वे, एसआरए, जिल्हाधिकारी आणि मुंबई महापालिकेला संयुक्त धोरण आखण्याचे निर्देश; तोडक कारवाई रोखण्यासाठी न्यायालयात भूमिका मांडण्याची तयारी मुंबई : कुर्ला विधानसभा मतदारसंघातील रेल्वे जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा एकदा राज्य सरकारच्या पातळीवर चर्चेत आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे प्रशासनाने रहिवाशांना जागा रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत […]
