इंडिया आघाडीत नाराजीचा सूर? उद्या होणारी बैठकही रद्द
नवी दिल्ली मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर इंडिया आघाडीत धुसफूस पाहायला मिळत आहे. उद्या दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या बैठकीत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह आघाडीतील काही प्रमुख नेते अनुपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात होते. […]