शहापूरच्या खराडेत वन जमिनीवर ‘बंजारा हिल्स’चा रस्ता? वन विभागाच्या अहवालानंतरही कारवाईवर प्रश्नचिन्ह
सर्व्हे क्र. ४०२/१ मधील जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप; माती उत्खननाच्या मोजणीची शासकीय कागदपत्रे समोर, तहसीलदारांच्या आदेशाविरोधात पुनर्विचाराची मागणी By रविंद्र मडके शहापूर (ठाणे) : शहापूर तालुक्यातील खराडे–चांदगाव परिसरातील ‘बंजारा हिल्स’ प्रकल्पाशी संबंधित वन जमिनीवरील कथित अतिक्रमण आणि गौण खनिज उत्खननाचे प्रकरण आता महसूल व वन विभागाच्या कागदपत्रांमुळे चर्चेत आले आहे. मौजे खराडे येथील सर्व्हे क्रमांक ४०२/१ […]
