शहराला राहण्यायोग्य बनवणे ही विकास नियोजन अभियंत्यांची जबाबदारी : महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी
मुंबई: केवळ टोलेजंग इमारती किंवा भव्य रस्ते म्हणजेच विकास नव्हे तर नागरिकांना गुणवत्तापूर्ण मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे आणि शहर त्यांच्यासाठी राहण्यायोग्य बनवणे फार महत्वाचे असते. केवळ विकास आराखडा तयार करुन विकास नियोजन अभियंत्यांची जबाबदारी संपत नाही तर त्याची अंमलबजावणी होऊन शहराला राहण्यायोग्य बनविणे हीसुद्धा त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे, महानगरपालिकेच्या विकास नियोजन विभागात कार्यरत प्रत्येक […]