महाराष्ट्रातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक; १० विभागांचे प्रतिनिधी सहभागी
मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचे प्रत्यक्ष मूल्यांकन करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय पथकाची स्थापना केली असून, कृषी व किसान कल्याण विभागाचे सहसचिव मुक्तानंद अग्रवाल या पथकाचे नेतृत्व करणार आहेत. केंद्र सरकारच्या विविध १० विभागांचे प्रतिनिधी या पथकात सहभागी असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने केंद्राकडे मदतीसाठी अंतरिम अहवाल सादर केला असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी […]
