बालकांचा गुन्हेगारीसाठी वापर करणाऱ्यांवर मकोका; कायदा अधिक कठोर करण्यासाठी उच्चस्तरीय समिती : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई: बालकांचा वापर संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी, मद्यविक्री किंवा इतर गंभीर गुन्ह्यांसाठी होत असल्याचे आढळल्यास संबंधित टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडली. प्रश्नोत्तराच्या तासात भाजप आमदार अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील काही गुन्हेगारी घटनांमध्ये बालकांचा वापर होत असल्याचा मुद्दा […]
