पालघरसाठी पूरनियंत्रणाचा दीर्घकालीन आराखडा; विशेष मदत पॅकेजसह ‘होल्डिंग स्पॉट’ संकल्पनेला गती
₹५८४.४५ कोटींच्या पुनर्बांधणी प्रस्तावावर चर्चा; जागतिक बँकेच्या सहकार्याने स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश मुंबई: पालघर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरानंतर राज्य सरकारने केवळ तात्पुरत्या मदत उपाययोजनांवर न थांबता दीर्घकालीन पूरनियंत्रण आणि शाश्वत विकासाच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पूरग्रस्तांसाठी विशेष मदत पॅकेज, वसई-विरार परिसरात ‘होल्डिंग स्पॉट’ विकसित करण्याची संकल्पना, जागतिक बँकेच्या सहकार्याने स्वतंत्र विकास […]

