महाराष्ट्र ताज्या बातम्या

निवडणुकीआधी पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्रीपद काढून घेणार होते – अजित पवार

X: @vivekbhavsar नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेससोबत बिघडलेले संबंध आणि त्याचा राज्याच्या तत्कालीन काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कारभारावर होणारा विपरीत परिणाम बघता तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly election) सहा महिने आधीच मुख्यमंत्री पदावरून काढून टाकण्यात येणार होते आणि त्या जागी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe – Patil) यांची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्य मागासवर्ग आयोग अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, सरकारने स्पष्टीकरणं द्यावं; विरोधी पक्ष नेते आक्रमक

मुंबई राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे निरगुंडे यांच्याकडून सरकारमधील दोन मंत्री आयोगाच्या कामात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्य सरकारने निरगुडे यांचा राजीनामा स्वीकारलाही आहे. यावरुन विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्य मागास वर्ग आयोगाचे सदस्य एकामागून एक आपला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आता शरद पवार गटाचे कार्यालयही बंडखोर गटाच्या ताब्यात

X: @NalavadeAnant नागपूर: नागपूर येथे आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्भूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला येथील विधिमंडळातील मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar) यांनी बहाल केल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. चार महिन्यांपूर्वी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमधून तब्बल ४३ आमदारांचा एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली फुटून (Split in NCP) सत्ताधारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भगवान गडावर पंकजा मुंडे अन् देवेंद्र फडणवीस आमने-सामने

बीड बीड जिल्ह्यातील परळी येथे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह पंकजा मुंडे यांनी हजेरी दर्शवली. आमंत्रण पत्रिकेत पंकजा मुंडेंचं नाव नसल्यामुळे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह होतं. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडे गोपीनाथ गड आणि भगवान गडावर उपस्थित राहिल्या. विशेष म्हणजे सत्ताबदलानंतर […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

आरोग्य यंत्रणा मजबुतीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये स्पेशालिटी रुग्णालय : एकनाथ शिंदे

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण ; ‘नमो 11’ सूत्री कार्यक्रमाचा शुभारंभ Twitter : @therajkaran रत्नागिरी सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी पाऊले उचलत आहोत. प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत (Strengthening of PHC) करत आहोत. सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त स्पेशालिटी रुग्णालये उभारण्यात येतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सांगितले. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (Government […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘जनाब’ बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख झाला तेव्हा संजय राऊत कुठे होते ?

Twitter : @NalavadeAnant मुंबई महाविकास आघाडीचे सरकार असताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Hiduhrudaysamrat Balasaheb Thackeray) यांच्या नावापुढे ‘हिंदुहृदयसम्राट’ ही उपाधी लावणे का बंद केले..? याचे उत्तर उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्रातील जनतेला आणि तमाम शिवसैनिकांना द्यावे, असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते प्रा. ज्योती वाघमारे (Prof Jyoti Waghmare), अरुण सावंत (Arun Sawant) आणि सौ. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई ठरणार देशातील पहिली झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी राबविणारी पालिका

Twitter : @therajkaran मुंबई मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये देशभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. यात गरीब तसेच गरजू रुग्णांची संख्या अधिक असते. त्यामुळे पालिका रुग्णालयांमध्ये देण्यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा व औषधोपचार उपलब्ध करुन देण्यासाठी ’झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी‘ (Zero Presription policy) राबविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (BMC Commissioner IS Chahal) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कर्जासाठी अवयव विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ – नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राज्यात शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवली आहे. कर्जफेडीसाठी (repayment of debt) अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी, हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. पण राज्यातील भाजपा सरकारला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

जुन्या पेन्शनसंदर्भात अधिकारी महासंघ आशावादी 

Twitter : @therajkaran मुंबई सर्व राज्य शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (Old pension) लागू करावी, याबाबत शासननियुक्त सुबोध कुमार समितीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. हा अहवाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde) यांनी आश्वासित केल्यानुसार, जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे आर्थिक लाभ; सामाजिक आणि आर्थिक स्थैर्यासह नवीन पेन्शनधारकांना निवृत्तीवेतन देणे, या मुख्य उद्दिष्टाचा समावेश […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राजकारण इम्पॅक्ट :  धुळे पोलीस अधीक्षकांची बदली

Twitter: @vivekbhavsar मुंबई  धुळे जिल्ह्यात फोफावलेली गुंडगिरी, शस्त्रांस्त्रांचे कारखाने आणि  तस्करी तसेच शेकडो एकरवर होणारी गांजाची शेती याकडे दुर्लक्ष करून केवळ बदल्यांमध्ये लक्ष घालून ‘माया ‘ जमवणारे धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांची अखेर आज बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक या दुय्यम आणि दुर्लक्षित विभागात पोलीस अधीक्षक म्हणून त्यांना पाठवण्यात आले आहे. […]