ताज्या बातम्या महाराष्ट्र

राजकारण इम्पॅक्ट :  धुळे पोलीस अधीक्षकांची बदली

Twitter: @vivekbhavsar

मुंबई 

धुळे जिल्ह्यात फोफावलेली गुंडगिरी, शस्त्रांस्त्रांचे कारखाने आणि  तस्करी तसेच शेकडो एकरवर होणारी गांजाची शेती याकडे दुर्लक्ष करून केवळ बदल्यांमध्ये लक्ष घालून ‘माया ‘ जमवणारे धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांची अखेर आज बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक या दुय्यम आणि दुर्लक्षित विभागात पोलीस अधीक्षक म्हणून त्यांना पाठवण्यात आले आहे. ही एक प्रकारची शिक्षा समजली जात आहे.

धुळे जिल्ह्यात फोफावलेल्या गुंडगिरी विरोधात ‘राजकारण’ (Therajkaran) ने ‘ देवेंद्रजी, धुळे पोलीस अधीक्षकांना आवरा‘  या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दाखल घेतली होती. प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी धुळे पोलीस अधीक्षकांवरील कारवाईचे संकेत दिले होते. दिवाळी संपल्यानंतर पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांची बदली होईल हे जवळपास निश्चित होते. दोन दिवसापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी बारकुंड यांच्या बदलीच्या फाईलवर स्वाक्षरी  केली आणि अंतिम मंजुरीसाठी फाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवली. मुख्यमंत्री शिंदे यांनी दौऱ्यावर जाण्यापूर्वी फाईलवर मोहोर उठवली आणि बारकुंड यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. बारकुंड यांची जागा पुणे लोहमार्गचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे घेतील.

विवेक भावसार

विवेक भावसार

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे. Vivek Bhavsar is an investigative journalist with over three decades of experience covering Maharashtra politics, governance, and public policy. He is the Founder and Editor of TheNews21 and The Rajkaran (राजकारण)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात