Maharashtra Deputy Chief Minister Eknath Shinde speaking to the media on the controversy over remarks against Deputy Chief Minister Sunetra Pawar. महाराष्ट्र ताज्या बातम्या

“राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांचा अपमान सहन करणार नाही”; सुनेत्रा पवारांवरील टिप्पणीवरून शिंदेंचा काँग्रेसवर घणाघात

मुंबई: राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये वापरण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या शब्दप्रयोगावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काँग्रेसवर जोरदार टीका करत या प्रकरणाला महिलांच्या सन्मानाचा प्रश्न असल्याचे म्हटले आहे. मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, “राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातील माता-भगिनींचा अपमान आहे. महिलांचा अवमान […]

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मत्स्यव्यवसाय विकास, कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार, मत्स्यपालन, डिजिटल नोंदणी आणि मत्स्य प्रक्रिया केंद्रांचे प्रतीकात्मक दृश्य. महाराष्ट्र ताज्या बातम्या

आता राज्यातील ‘मत्स्यसंपदा’वर महायुती सरकारचा मास्टरस्ट्रोक…?

प्रत्येक तालुक्यात विशेष शिबिरे, प्रशिक्षण केंद्रांना गती; किनारपट्टीवरील लाखो मच्छिमारांपर्यंत योजना पोहोचविण्याची तयारी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे अधिकाऱ्यांना ‘मिशन मोड’चे निर्देश मुंबई : राज्यातील किनारपट्टीवरील लाखो मच्छिमारांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळावा आणि मत्स्यव्यवसाय अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ मिशन मोडमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत प्रत्येक […]

भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळाची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांच्यासोबत मुंबईतील बैठकीदरम्यान चर्चा. महाराष्ट्र ताज्या बातम्या

बोगस नोंदणीवर आता फौजदारी गुन्हे; बांधकाम कामगारांच्या लाभ वितरणात मोठे बदल  

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांतील गैरव्यवहार रोखण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. बोगस नोंदणी करणारे कामगार, बनावट प्रमाणपत्र देणारे ठेकेदार आणि बेकायदेशीर एजंट यांच्याविरोधात थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर वस्तूरूपी लाभ बंद करून लाभार्थ्यांच्या खात्यात थेट डीबीटीद्वारे रक्कम जमा करण्यासह अनेक प्रशासकीय सुधारणांवरही शिक्कामोर्तब करण्यात आले.   […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Loan Waiver: कर्जमाफीचे संकेत : मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत (Loan waiver to farmers) सकारात्मक संकेत मिळत असल्याने मराठवाड्यातील (Marathwada) शेतकरी वर्गात आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्जमाफीचा निर्णय झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होणार असल्याचे चित्र आहे. कारण मागील महिन्यातच मराठवाड्यात ७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या (76 farmers committed suicide in Marathwada) केल्याची नोंद शासन दप्तरी आहे. कर्जबाजारीपणामुळे मराठवाड्यातील अनेक शेतकरी आर्थिक […]

ajit pawar महाराष्ट्र ताज्या बातम्या

Ajit Pawar: अजितदादा बंगल्यातून विमानतळावर निघाल्याचे सीसीटीव्ही फूटेज मुख्यमंत्र्यांकडे का मागितले नाही?

अजितदादांच्या विश्वासू नेत्याचा पक्षातील नेत्यांनाच रोखठोक सवाल मुंबई – “आम्हीही आमचं दैवत गमावलं असताना, दुर्दैवाने शरदचंद्र पवार गटाकडून (Sharad Pawar faction of NCP) या घटनेवर राजकारण केलं जात आहे,” असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे (NCP Spokesperson Anand Paranjape) यांनी केले होते. या वक्तव्यावरून त्यांच्याच पक्षातील अजितदादांचे विश्वासू व ज्येष्ठ नेते यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, परांजपे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Year-End : कोकण : प्रवास मूल्याधिष्ठित राजकारणाकडून घराणेशाहीपर्यंत

कोकणच्या राजकारणाची (Politics in Konkan) ओळख दीर्घकाळ विचार, मूल्ये आणि वैचारिक शुचिता यांवर आधारित होती. संसदेत गाजलेली बॅरिस्टर नाथ पै यांची भाषणे, मधू दंडवते यांची राष्ट्रीय पातळीवरील छाप, बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांची प्रभावी राजकीय कारकीर्द, देशाचे पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख, संयमी नेतृत्वाचे प्रतीक असलेले सुरेश प्रभू, तसेच हुसेन दलवाई, दी. बा. पाटील, दत्ता पाटील, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Year-End: Maharashtra 2025: बदलते समाजरूप, अस्थिर ग्रामीण वास्तव आणि सत्ताकेंद्रित राजकारण

१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची (Samyukt Maharashtra)निर्मिती झाली. एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेले हे राज्य आज ६५ वर्षांचे झाले आहे. या कालखंडात महाराष्ट्राने अनेक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय टप्पे अनुभवले. आज राज्याची लोकसंख्या सुमारे १२.८० कोटी इतकी असून ३६ जिल्हे आणि ३५८ तालुके असलेले महाराष्ट्राचे सामाजिक-राजकीय स्वरूप अत्यंत वैविध्यपूर्ण आहे. प्रत्येक विभागाची समस्या, राजकीय […]

मुंबई ताज्या बातम्या

BMC Elections: भांडुप ११४: मनसेच्या अनिशा माजगावकर कोणाकडून लढणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?

मुंबई: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची (Uddhav – Raj alliance) घोषणा झाल्यानंतर मुंबई महापालिकेतील (BMC elections) जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. मात्र भांडुप विधानसभा Bhandup Assembly constituency) मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११४वरून अद्याप स्पष्ट तोडगा निघालेला नसल्याने, युतीतील पहिला मोठा पेच याच प्रभागात निर्माण झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या अनिशा माजगावकर (MNS Leader […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Ayurved : आयुर्वेद क्षेत्राचा गौरव : डॉ. मनीषा कोठेकर यांचा सन्मान 

नाशिक :नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिनच्या (NCISM) अध्यक्षपदी नियुक्त झाल्याबद्दल डॉ. मनीषा उपेंद्र कोठेकर यांचा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (Maharashtra Health Science University) यांच्यावतीने गौरव करण्यात आला. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अजय चंदनवाले यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सचिन मुंबरे, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Elections : महानगरपालिका निवडणुकांत स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार देणार; मतदारांना ठोस पर्याय देऊ – हिंदू महासभा

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या भ्रष्टाचार, पक्षनिष्ठेची हेळसांड आणि तत्त्वांची पायमल्ली यामुळे गढूळ झाले असल्याचा आरोप करत, राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांत (Corporation elections) स्वच्छ, प्रामाणिक आणि जनहिताशी बांधील उमेदवार देऊन मतदारांना ठोस पर्याय देणार, अशी भूमिका दिनेश भोगले यांनी मांडली आहे. हिंदू महासभा (Hindu Mahasabha) केवळ निवडणूक लढवण्यासाठी नव्हे, तर राज्यातील राजकीय संस्कृतीत सकारात्मक […]