ताज्या बातम्या महाराष्ट्र

दिंडोरी मतदारसंघावरुन शरद पवारांसमोर मोठा पेच; माकपचे जिवा पांडू मैदानात उतरण्याच्या तयारीत

नाशिक : माकपने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाबद्दलची आपली भूमिका बदलल्याचं चित्र आहे. ऐनवेळी माकपने शक्तिप्रदर्शन करीत दिंडोरीतून स्वत: चा उमेदवार उभा करण्याची तयारी दर्शवल्याने महाविकास आघाडीसमोर मोठी पेच निर्माण झाला आहे. आतापर्यंत मार्कवादी कम्युनिस्ट पक्षाकडून महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. या जागेवरुन माकपचे इच्छूक उमेदवार जिवा पांडू गावित यांच्यासोबत शरद पवारांची बैठक झाली होती. […]