Election Day: “बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय” – उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले
मुंबई: मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी गुरुवारी मतदान पार पडले. आज सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मात्र त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी थेट निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार टीका केली. “मतदान हा आजचा नवा विषय नाही. पण यंदा पहिल्यांदाच मुंबईसह काही महानगरपालिकांमध्ये मतदारांच्या बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याचे प्रकार समोर आले. […]


