कर्जमाफीवरून विधानसभेत खडाजंगी; ‘शेतकऱ्यांना मामा बनवणाऱ्या सरकारचा धिक्कार’ म्हणत विरोधकांचा सभात्याग
मुंबई : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून “शेतकरी सुखी तर महाराष्ट्र समृद्ध” हेच शासनाचे ब्रीद असल्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत स्पष्ट केले. मात्र सरसकट कर्जमाफीच्या मागणीवरून विरोधी पक्ष सदस्य असमाधानी राहिले आणि घोषणाबाजी करत सभात्याग केला. नियम २९३ अंतर्गत सत्ताधारी सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना कृषीमंत्री भरणे म्हणाले की, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपण स्वतः […]
