‘विकसित महाराष्ट्र 2047’साठी अर्थसंकल्प रोडमॅप; लाडकी बहीण योजना सुरूच राहणार : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई: राज्याची अर्थव्यवस्था २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘विकसित महाराष्ट्र-2047’ व्हिजन डॉक्युमेंटच्या अंमलबजावणीसाठी २०२६-२७ चा अर्थसंकल्प महत्त्वाचा रोडमॅप ठरेल, असे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी विधानसभेत अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सांगितले. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजना सुरूच राहील, अशी ग्वाहीही दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, २०४७ पर्यंत उद्योग क्षेत्राचा राज्याच्या स्थूल उत्पन्नातील वाटा ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. […]
