महाराष्ट्र ताज्या बातम्या

एका दिवसात १५ महसूल सेवा निकाली काढणार; शिवजयंतीच्या पर्वावर महसूल मंत्र्यांची महत्त्वाकांक्षी घोषणा

मुंबई: शिवजयंतीच्या महापर्वावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ जाहीर केले. हे अभियान राज्यातील सर्व महसूल मंडल तसेच नगरपालिका व नगरपंचायतींच्या क्षेत्रात पुढील दोन महिन्यांत एकूण सहा दिवस राबविले जाणार असून, पूर्वतयारीला शिवजयंतीपासून प्रारंभ होत आहे. या अभियानाची राज्यस्तरीय अंमलबजावणी महसूल मंत्र्यांच्या थेट देखरेखीखाली दररोज होणार आहे. यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Muslim Minority : अल्पसंख्याक प्रशिक्षण संस्थेला अखेर गती

रखडलेल्या ११ पदांना उच्चस्तरीय समितीची मंजुरी; सपा आमदार रईस शेख यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई : दीड वर्षांपूर्वी राज्यात स्थापन झालेल्या अल्पसंख्याक प्रशिक्षण व संशोधन संस्था (मार्टी) मनुष्यबळाअभावी ठप्प होती. मात्र समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे उच्चस्तरीय समितीने संस्थेसाठी मंजूर असलेल्या ११ पदांना अखेर मान्यता दिली आहे. त्यामुळे नव्या वर्षात ‘मार्टी’चा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

दादर रेल्वे पोलीस वसाहतीच्या विकासासाठी शासनाचा पुढाकार — राज्यमंत्री योगेश कदम

दादर, मुंबई: मुंबईतील प्रत्येक रेल्वे पोलीस बांधवाला स्वतःचं हक्काचं घर मिळावं यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार या घरांची उभारणी टप्प्याटप्प्याने करण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. मा. कदम यांनी आज दादर (पूर्व) येथील रेल्वे पोलीस वसाहतीला भेट देऊन तेथील पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यांनी वसाहतीची पाहणी […]