आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत सर्व आरोग्य समित्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश
मुंबई : राज्यातील आरोग्य सेवेची गुणवत्ता उंचावण्यासाठी आणि नागरिकांना अधिक परिणामकारक व पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या विविध आरोग्य समित्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. रुग्ण कल्याण समिती (RKS), जन आरोग्य समिती (JAS), महिला आरोग्य समिती (MAS) आणि ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती (VHNSC) या समित्यांवर आरोग्य व्यवस्थेच्या देखरेखीची महत्त्वपूर्ण जबाबदारी […]
