महाराष्ट्र ताज्या बातम्या

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न सन्मान मिळावा : राज ठाकरे

X: @NalavadeAnant मुंबई: देशभराच काय अगदी जगभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या प्रख्यात व्यंगचित्रकार म्हणून नावाजलेले बहुआयामी व्यक्तिमत्व हिंदुहृदसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे या नेत्यालाही केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी जाहीर मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी येथे केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, चौधरी चरणसिंग […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्र व देशात काँग्रेसची सत्ता पुन्हा येईल : काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला 

X: @NalawadeAnant मुंबई: भाजप सरकारविरोधात देशभरात मोठा आक्रोश असून विरोधी पक्षांना घाबरवण्यासाठीच ते ईडी, सीबीआयचा गैरवापर करत आहेत. पण भाजपाच्या या दडपशाहीसोर काँग्रेस डगमगली नाही. महाराष्ट्र हे काँग्रेस विचाराचे राज्य आहे. एकजुटीने काम केले तर महाराष्ट्रात व देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी येथे कार्यकारिणीच्या विस्तारित बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

तर गृहमंत्र्यांचा दरारा दिसायला हवा होता : जयंत पाटील

X : @NalavadeAnant नागपूर राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र बिहारच्या देखील मागे पडला आहे. उपराजधानी नागपुरातही तीच परिस्थिती आहे. त्यामूळे फडतूस नाही, काडतूस आहे म्हणणाऱ्या गृहमंत्र्यांचाही दरारा नाही, अशा कठोर शब्दात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ आमदार जयंत पाटील (NCP leader Jayant Patil) यांनी बुधवारी […]

लेख

सत्यशोधक समाज : शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष

Twitter : @therajkaran लोकहितवादी, महात्मा फुले, न्या रानडे, गोपाळ गणेश आगरकर यांच्याप्रमाणेच मुकुंदराव पाटील यांनी सामाजिक सुधारणेचा पक्ष घेतला. देशाच्या स्वातंत्र्याची कळकळ असणे योग्य असले तरी समाजाच्या अधोगतीकडे दुर्लक्ष करून देशाची उन्नती होणे अशक्य आहे. सर्व समाजात शांतता, समता आणि ममता यांचा प्रसार करून सर्व मागासलेल्या वर्गाची विद्यादेवीच्या मंदिरात परस्परांशी ओळख पटविणे, देशबंधुत्व अनुभवास आणून देणे ही देशोन्नतीची अंगे आहेत, […]