Assembly Session : मुंबईतील कापड गिरण्यांच्या जमिनीवरील चाळींच्या पुनर्विकासाला गती; नियमावलीत फेरबदल — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा
नागपूर – मुंबईतील कापड गिरण्यांच्या जमिनींवरील जुन्या, धोकादायक चाळी आणि वस्त्यांच्या पुनर्विकासाला आता झपाट्याने गती मिळणार आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. कापड गिरण्यांच्या जमिनीवरील बहुसंख्य चाळी अत्यंत जर्जर स्थितीत असून, रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचा तातडीने पुनर्विकास आवश्यक आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री […]
