अवैध विदेशी नागरिकांवर कारवाई कडक; महाराष्ट्रातही अंमलबजावणी सुरू – फडणवीस
मुंबई: शैक्षणिक आणि वैद्यकीय व्हिसावर भारतात येऊन कालावधी संपल्यानंतरही अवैध वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांवर कारवाई तीव्र करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. प्रश्नोत्तर तासात भाजप आमदार स्नेहा दुबे यांनी नालासोपारा परिसरात अवैधरित्या राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांचा आणि त्यांचा अमली पदार्थ तस्करीतील सहभाग याबाबत प्रश्न उपस्थित केला. “अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी विदेशी नागरिक […]
