ताज्या बातम्या राष्ट्रीय

इंडिया आघाडीत नाराजीचा सूर? उद्या होणारी बैठकही रद्द

नवी दिल्ली मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर इंडिया आघाडीत धुसफूस पाहायला मिळत आहे. उद्या दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या बैठकीत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह आघाडीतील काही प्रमुख नेते अनुपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात होते. […]

विश्लेषण ताज्या बातम्या

“राजमल”वरचा छापा पवारांची रसद तोडण्यासाठी?

Twitter: @therajkaran मुंबई  सोन्याच्या व्यापारासाठी प्रसिद्द असलेल्या जळगावात राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या मालकीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं केलेल्या छापेमारीनं (Raid by ED on Rajmal Lakhichand Jewelers)एकच खळबळ उडाली आहे. जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बरीच वर्षे खजीनदार होते. त्यामुळे ईडीच्या या कारवाईमागे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर राजकीय दबाव (Political pressure on Sharad […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या विश्लेषण

…या तीन कारणांसाठी उद्धव ठाकरे लढू शकतील लोकसभेची निवडणुक

Twitter : @vivekbhavsar मुंबई 2024 च्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झालेली आहे. भाजपाप्रणित एनडीए (NDA) आणि विरोधकांचं ऐक्य असलेल्या “इंडिया”त (INDIA) हा सामना चांगलाच रंगणार आहे. महाराष्ट्रातही भाजपा आणि मविआच्या तिन्ही पक्षांकडून स्वतंत्रपणे राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येतोय. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटासाठी ही लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. अशात लोकसभा निवडणुकीत […]