Winter Session : तुकडेबंदी शिथिल करणारे विधेयक मंजूर; ६० लाख कुटुंबांना दिलासा, सातबारावर आता स्वतंत्र नाव
नागपूर – राज्यातील नागरी वस्त्यांमध्ये लहान भूखंडांवर घरे बांधून राहणाऱ्या सुमारे ६० लाख कुटुंबांना मोठा दिलासा देणारे ‘महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२५’ आज विधानसभेत मंजूर झाले. तुकडेबंदीतील जाचक अटी शिथिल केल्याने आता लहान भूखंडांची खरेदी-विक्री सुलभ होणार असून, संबंधित मालकांचे स्वतंत्र नाव सातबारा उताऱ्यावर लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे विधेयक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात मांडले. अनेक वर्षांपासून ५-१० गुंठे किंवा […]
