तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची कामे अडता कामा नयेत : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई — छोट्या-छोट्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची जमीनविषयक कामे अडू नयेत, अशा सक्त सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. याचबरोबर महसूल विभागासाठी स्वतंत्र डाटा सेंटर उभारण्याची आणि विभागाच्या तांत्रिक सक्षमीकरणाची घोषणा त्यांनी गुरुवारी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत केली. “जमिनीशी संबंधित डेटा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा आहे. या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करतानाच महसूल विभाग अधिक सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी […]
