महाराष्ट्र ताज्या बातम्या

Elections: लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी महानगर निवडणुकीत फक्त काँग्रेसलाच मतदान करा – किशोर तिवारी

मुंबई :  महाराष्ट्रात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तसेच धर्मद्वेष व भाषाद्वेष रोखण्यासाठी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत फक्त काँग्रेसलाच मतदान करणे काळाची गरज आहे, असे आवाहन शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केले आहे. नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकांमध्ये महायुतीतील भाजप, शिंदेसेना व अजित पवार गटाने मतदार विकत घेऊन आणि मुस्लिम मतदारांना मतदान न करण्यासाठी पैसे वाटून निवडणुका जिंकल्या, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

BMC Elections: “कष्टकऱ्यांची लुंगी… ठाकरे बंधूंची पुंगी वाजवणार!” – भाजपचे वरिष्ठ नेते निरंजन शेट्टी यांचा हल्लाबोल

मुंबई : “भारताच्या कष्टकरी जनतेचा पोशाख असलेली लुंगी ठाकरे बंधूंची पुंगी वाजवल्याशिवाय राहणार नाही,” असा घणाघात भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते निरंजन शेट्टी यांनी केला आहे. रविवार, ११ जानेवारी २०२५ रोजी ठाकरे बंधूंच्या जाहीर सभेत मनसेचे स्वयंघोषित प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दक्षिण भारतीय नागरिकांना उद्देशून केलेल्या “उठाव लुंगी, बजाव पुंगी” या वक्तव्यावर शेट्टी यांनी जोरदार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Thane Election : ६० लाख मतदार, सहा महापालिका; ठाणे जिल्ह्यातील निकाल ठरवणार राज्याच्या राजकीय दिशेचा सूर

मुंबई: ठाणे जिल्ह्यातील सहा महानगरपालिका निवडणुका या केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न राहता, राज्याच्या शहरी राजकारणाचा कणा कोणाच्या हाती जाणार याचा निर्णय देणाऱ्या ठरणार आहेत. मुंबईच्या सीमेलगत असलेल्या या जिल्ह्यात तब्बल ६० लाखांहून अधिक मतदार उमेदवारांचे आणि पक्षांचे भवितव्य ठरवणार आहेत. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर या सहा महानगरपालिकांमध्ये होणाऱ्या निवडणुकांकडे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईसह महापालिकेत स्वबळाचा पर्यायही खुला : सुनिल तटकरे

मुंबई — महायुतीतील सामंजस्य कसे टिकवता येईल, यासाठी प्रयत्न सुरूच राहतील. नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असल्याने महायुतीतील चर्चा व वाटाघाटी या राज्यपातळीवरील नेत्यांच्या उपस्थितीत होत असतात. त्यामुळे या संदर्भातील निर्णय आज किंवा उद्या घेतला जाईल, असा स्पष्ट निर्वाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी गुरुवारी पक्ष कार्यालयात पत्रकारांशी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Elections : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती–आघाडीविरहित एकत्र लढवाव्यात – ॲड. (डॉ.) सुरेश माने

मुंबई : महाराष्ट्रात नुकत्याच काही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पार पडल्या असून, जानेवारी 2026 मध्ये उर्वरित सर्व निवडणुका—महानगरपालिकांसह—होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्यातील राजकीय चित्र स्पष्टपणे दोन ध्रुवांमध्ये विभागले गेले आहे. काँग्रेसप्रणीत चार–पाच पक्षांची महाविकास आघाडी अस्तित्वाची लढाई लढत आहे, तर भाजपप्रणीत चार–पाच पक्षांची महायुती वर्चस्वासाठी मैदानात उतरली आहे. परिणामी, महाराष्ट्रात राजकीय ध्रुवीकरण अधिक तीव्र झाले आहे. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : हिवाळी अधिवेशन संपताच 29 महानगरपालिका आणि 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा धडाका?

राज्य निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात; 10 डिसेंबरपर्यंत अंतिम मतदार यादी मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 15 डिसेंबरला संपताच महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका आणि 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा केव्हाही होऊ शकते, असे राजकीय निरीक्षकांकडून संकेत मिळत आहेत. दुसरीकडे, राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेच्या तयारीला जोरदार गती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sunil Tatkare : “दुसऱ्यावर गलिच्छ आरोप करणे हा त्यांचा आयुष्यभराचा धंदा” — खा. सुनील तटकरे यांची मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यावर झोड

By Nalawade मुंबई — “माझ्यावर झालेले आरोप निराधार आहेत आणि त्याच्याशी माझा दूरान्वये संबंध नाही. पण स्वतः कृत्य करायचं आणि दुसऱ्यावर गलिच्छ आरोप करत फिरायचं—हा त्यांचा आजपर्यंतचा धंदाच आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी शिंदे गटाचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यावर जोरदार पलटवार केला. त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही […]

लेख

महाराष्ट्राच्या स्थानिक निवडणुकीत पैशांचा पाऊस, आयोगाचा गोंधळ आणि बरंच काही!

By: विक्रांत पाटील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा पाया, पण तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रात याच पायाला पैशाच्या आणि प्रशासकीय अनास्थेच्या वाळवीने पोखरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. लोकशाहीचा हा उत्सव उत्साहात साजरा होण्याऐवजी, तो पैशांच्या खेळाचे, निवडणूक आयोगाच्या सावळा गोंधळाचे आणि न्यायालयीन गुंतागुंतीचे एक मोठे प्रदर्शन ठरत आहे. एकीकडे मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशांचा अक्षरशः […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Elections : नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर काँग्रेसचा भर…!

हर्षवर्धन सपकाळ यांची जाहीर भूमिका मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये (Local Body Elections) काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागा लढवण्यावर भर देणार असून ही सत्तेसाठी नव्हे तर विचारांसाठीची लढाई आहे, असे स्पष्ट विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (MPCC President Harshwardhan Sapkal) यांनी केले. त्यांनी महायुतीतील (Mahayuti) कोणत्याही पक्षाशी आघाडी न करण्याचाही ठाम निर्णय व्यक्त केला. मात्र, त्यांच्या या भूमिकेमुळे मित्रपक्षांमध्ये असंतोष […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासह नवीन प्रभाग रचना कायम; रायगड जिल्हा परिषद सदस्यसंख्या ५९ वरून ६६

महाड : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court on OBC reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body elections) नवीन प्रभाग रचनेनुसार आणि २७% ओबीसी आरक्षणासह (OBC reservation) घेण्यास हिरवा कंदील दिला आहे. यामुळे प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळण्यात आल्या असून रायगड जिल्हा परिषदेची (Raigad Zilla Parishad) सदस्यसंख्या ५९ वरून ६६ वर जाणार आहे. न्यायालयाने स्पष्ट केले […]