मुंबई ताज्या बातम्या

Assembly Session : मुंबई मनपा शाळांचे खासगीकरण: विधानसभेत प्रश्नोत्तर तासात मोठा गदारोळ

उत्तरांवर सदस्यांचे समाधान नाही; अध्यक्ष नार्वेकर यांचे स्पष्ट निर्देश नागपूर – मुंबई महानगरपालिका शाळांचे खासगीकरण या संवेदनशील मुद्द्यावर आज विधानसभेतील प्रश्नोत्तर तासात जोरदार चर्चा झाली. राज्य मंत्री, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि ज्येष्ठ मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उत्तरांनी सदस्य समाधानी नसल्याने सभागृहात क्षणोक्षणी तणाव वाढला. अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदस्यांना स्पष्ट निर्देश देत म्हटले—“उत्तर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Winter Session : तुकडेबंदी शिथिल करणारे विधेयक मंजूर; ६० लाख कुटुंबांना दिलासा, सातबारावर आता स्वतंत्र नाव

नागपूर – राज्यातील नागरी वस्त्यांमध्ये लहान भूखंडांवर घरे बांधून राहणाऱ्या सुमारे ६० लाख कुटुंबांना मोठा दिलासा देणारे ‘महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२५’ आज विधानसभेत मंजूर झाले. तुकडेबंदीतील जाचक अटी शिथिल केल्याने आता लहान भूखंडांची खरेदी-विक्री सुलभ होणार असून, संबंधित मालकांचे स्वतंत्र नाव सातबारा उताऱ्यावर लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे विधेयक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात मांडले. अनेक वर्षांपासून ५-१० गुंठे किंवा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात डिजिटल–फोरेन्सिक पुरावे; ६० दिवसांत आरोपपत्र दाखल करणार : CM फडणवीस

नागपूर – सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी डिजिटल तसेच फोरेन्सिक दोन्ही पातळ्यांवर ठोस पुरावे मिळाले असून, आरोपींनी तिची फसवणूक केल्याचे चौकशीत स्पष्ट दिसत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. राज्य सरकार पुढील ६० दिवसांत आरोपपत्र दाखल करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. भाजप सदस्य अमित साटम यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. उपप्रश्नांमध्ये विजय वडेट्टीवार, नाना पटोले, सुनील […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Winter Session : मुंबई CSMT प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार; विधानसभेत CM फडणवीसांची घोषणा

नागपूर – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानक प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. ही घोषणा होताच सभागृहात सदस्यांनी बाके वाजवून जोरदार स्वागत केले आणि “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी जय शिवाजी” असा जयघोष केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मागील अधिवेशनात CSMT परिसरात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक १ डिसेंबरला; नागपूर अधिवेशनाच्या कालावधीवर निर्णय

मुंबई — राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ८ डिसेंबरपासून सुरू होत असून या अधिवेशनाचा कालावधी, मांडण्यात येणारी विधेयके आणि कामकाजाचा क्रम निश्चित करण्यासाठी विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक १ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजता विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक विधानमंडळाचे अवर सचिव देबडवार यांनी जारी केले आहे. सध्या राज्यात […]