रायगडावर प्री-वेडिंग शूट कसे झाले? प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न
महाड : सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला रायगड किल्ला हा केवळ ऐतिहासिक वास्तू नसून हिंदवी स्वराज्याच्या अभिमानाचा जिवंत साक्षीदार आहे. अशा पवित्र स्थळी अलीकडेच झालेल्या प्री-वेडिंग शूटच्या घटनेने शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असून, “गड-किल्ले जपा, इतिहास जपा — हाच खरा शिवभक्तीचा मार्ग”, असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी केले. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सावंत म्हणाले […]


