विधानपरिषदेत प्रलंबित आश्वासनांवर लगाम: सभापती राम शिंदे यांचे कडक निर्देश
मुंबई : विधानपरिषदेत सदस्यांनी विविध संसदीय आयुधांद्वारे उपस्थित केलेल्या मुद्यांचे निराकरण विहित कालमर्यादेत करणे अत्यावश्यक आहे, असे स्पष्ट निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. अतारांकित प्रश्न, औचित्याचे मुद्दे, लक्षवेधी सूचना, विशेष उल्लेख, मंत्रीमहोदयांची आश्वासने तसेच महाराष्ट्र विधानपरिषद नियम 93 अंतर्गत दिलेल्या सूचनांबाबत प्रलंबितता राहू नये. प्रलंबित बाबी असल्यास त्या तातडीने निकाली काढाव्यात, असे […]
