जनआरोग्य योजनेतील कथित गैरप्रकारांवर सरकारची कारवाई; १९ रुग्णालयांचे परवाने रद्द, विशेष भरारी पथके तैनात
१६ हजार संशयित दाव्यांचा दावा; विरोधकांची एसआयटी चौकशीची मागणी, विधानसभेत सरकारची माहिती मुंबई : गरीब रुग्णांसाठी राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील कथित गैरप्रकारांवर बुधवारी विधानसभेत जोरदार चर्चा झाली. संशयित दावे, काही रुग्णालयांतील कथित अनियमितता आणि योजनेंतर्गत निधीच्या वापराबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांमुळे हा विषय सभागृहात गाजला. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी योजनेंतर्गत गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष […]

