महाराष्ट्र ताज्या बातम्या

Election Day: मुंबई मनपातील वाढत्या मतदानामुळे भाजपमध्ये धडकी?

हिंदी प्रसार माध्यमांतून खोटे नॅरेटिव्ह पसरवण्याचा आरोप मुंबई: तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत गुरुवारी झालेल्या मतदानाला मराठी मतदारांसह अल्पसंख्यांक, तरुण-तरुणी आणि महिलांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांमध्ये धडकी भरल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंच्या आवाहनाला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने भाजपची चिंता वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

BMC Elections: “कष्टकऱ्यांची लुंगी… ठाकरे बंधूंची पुंगी वाजवणार!” – भाजपचे वरिष्ठ नेते निरंजन शेट्टी यांचा हल्लाबोल

मुंबई : “भारताच्या कष्टकरी जनतेचा पोशाख असलेली लुंगी ठाकरे बंधूंची पुंगी वाजवल्याशिवाय राहणार नाही,” असा घणाघात भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते निरंजन शेट्टी यांनी केला आहे. रविवार, ११ जानेवारी २०२५ रोजी ठाकरे बंधूंच्या जाहीर सभेत मनसेचे स्वयंघोषित प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दक्षिण भारतीय नागरिकांना उद्देशून केलेल्या “उठाव लुंगी, बजाव पुंगी” या वक्तव्यावर शेट्टी यांनी जोरदार […]

मुंबई ताज्या बातम्या

BMC election : “स्वप्नांचे व्यापारी” मुख्यमंत्री; चार वर्षांत काय केलं?; जाहीरनाम्याची आठवण करून देत सचिन सावंत यांचा घणाघात

मुंबई : मुख्यमंत्री स्वतःला “स्वप्नांचे सौदागर” म्हणवून घेत असले तरी, प्रत्यक्षात महाराष्ट्राचं वर्तमान किती काळोख आहे, याचं उत्तर ते देत नाहीत, असा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे. सोशल मीडियावर केलेल्या सलग दोन ट्वीट्समध्ये सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी थेट सवाल उपस्थित करत म्हटलं आहे की, […]

मुंबई ताज्या बातम्या

BMC election : कुर्ल्यातील वॉर्ड क्रमांक १६७ मधून महायुतीचा उमेदवार हद्दपार

By Raju Zanke मुंबई – राज्यातील २९ महानगरपालिकांचा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाच, मुंबई महानगरपालिकेची सत्ता ताब्यात घेण्याचा निर्धार करणाऱ्या भाजप-शिवसेना महायुतीला कुर्ल्यातील वॉर्ड क्रमांक १६७ मध्ये उमेदवारच मिळाला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कुर्ला पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक १६७ हा ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. या मतदारसंघातून काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेना (उबाठा), पीपल्स […]

मुंबई ताज्या बातम्या

BMC Elections : भाजपला पराभव दिसू लागल्याने प्रचारसभांमध्ये अश्लील नृत्यांचा आधार?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा आरोप, व्हिडीओ व्हायरल मुंबई – “यंदाची मुंबई महानगरपालिका भाजपच जिंकणार” अशा दर्पोक्ती करणाऱ्या भाजप नेत्यांना आता दोन्ही ठाकरे बंधूंच्या भक्कम युतीमुळे आपला पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळेच भाजपने मुंबईतील प्रचारसभांमध्ये बिहार व उत्तर प्रदेशातून आणलेल्या गायिकांच्या अश्लील नृत्यांचा आधार घेतल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आखिल […]

मुंबई ताज्या बातम्या

BMC Elections : बिनविरोध निवडणुकांमागे मनमानी निर्णयप्रक्रिया आणि अपारदर्शक व्यवस्था कारणीभूत? – निलेश चव्हाण

ठाणे: राज्यात मोठ्या संख्येने झालेल्या बिनविरोध नगरसेवक निवडींकडे केवळ कार्यकर्त्यांच्या दोषांमधून पाहणे चुकीचे ठरेल, असा ठाम मतप्रवाह सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक निलेश चव्हाण (ठाणे) यांनी व्यक्त केला आहे. बिनविरोध निवडणुका का आणि कशामुळे झाल्या, याचा शांतपणे आणि सखोल विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. चव्हाण यांच्या मते, कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता विविध राजकीय पक्षांचे […]

मुंबई ताज्या बातम्या

BMC Elections : मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेची अवस्था ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’!

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे भाजपसोबत सन्मानजनक जागावाटप झाले असले, तरी प्रत्यक्ष मैदानात शिंदेंच्या शिवसेनेची अवस्था मुंबईत ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’ अशी झाल्याचे चित्र समोर आले आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे कुलाब्यातील वॉर्ड क्रमांक २२५. जागावाटपात हा वॉर्ड भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर भाजपने राहुल नार्वेकर यांच्या नातेवाईक हर्षिता नार्वेकर यांना उमेदवारी […]

मुंबई ताज्या बातम्या

BMC elections : उद्धव सेना–मनसे युतीत भांडुप, लोअर परळ आणि माहिममध्ये अडथळे

X: @vivekbhavsar मुंबई: मुंबई महापालिकेत (BMC) पुन्हा सत्तेत येण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान ११४  जागा थेट जिंकणे कठीण असल्याची जाणीव दोन्ही नेत्यांना आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंनी किमान एकत्रित […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

BMC elections : महापालिका निवडणुकीत विधानसभा मतदान केंद्रे कायम ठेवावीत — आमदार पराग शाह यांची मागणी

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घाटकोपर (पूर्व) विधानसभा क्षेत्राचे आमदार पराग शाह यांनी नागरिकांच्या सोयीसाठी विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने मतदान केंद्रे ठेवण्यात आली होती, तीच व्यवस्था आगामी महापालिका निवडणुकीतही कायम ठेवावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. शाह यांनी म्हटले की, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आणि जास्त मतदारसंख्या असलेल्या इमारतींमध्ये मतदान केंद्रे ठेवण्यात आल्याने मतदारांना मोठी […]