महाराष्ट्र ताज्या बातम्या

Winter Session : मुंबई CSMT प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार; विधानसभेत CM फडणवीसांची घोषणा

नागपूर – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानक प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. ही घोषणा होताच सभागृहात सदस्यांनी बाके वाजवून जोरदार स्वागत केले आणि “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी जय शिवाजी” असा जयघोष केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मागील अधिवेशनात CSMT परिसरात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शासकीय भूखंडावरील इमारतींच्या स्वयं/समूह पुनर्विकासासाठी राज्य सरकारची नवी धोरणात्मक रूपरेषा जाहीर

मुंबई: मुंबईतील व राज्यातील शासकीय भूखंडांवरील जुन्या इमारतींच्या स्वयं किंवा समूह पुनर्विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने व्यापक धोरण अंतिम केले आहे. महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत या धोरणाला मंजुरी देण्यात आली. अनेक वर्षे प्रक्रियात्मक अडथळ्यांमुळे ठप्प झालेल्या पुनर्विकास प्रकल्पांसाठी हे धोरण महत्त्वाचे मानले जात आहे. पुनर्विकासासाठी मोठ्या सवलती आणि रचनात्मक बदल स्वयंपुनर्विकास करणाऱ्या संस्थांना […]