अनुदान मागण्यांच्या चर्चेत मंत्री नसल्याने विधानसभेत गदारोळ
मुंबई: अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान संबंधित खात्यांचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत विरोधी पक्षांनी जोरदार गदारोळ केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि काँग्रेस सदस्यांनी संबंधित मंत्री सभागृहात येईपर्यंत चर्चा पुढे नेऊ नये आणि कामकाज तहकूब करावे, अशी मागणी केली. मात्र सत्तारूढ पक्षाने याला तीव्र विरोध करत, मंत्री उत्तर देताना विरोधी सदस्य सभागृहात […]
