‘हाफकिनची एक इंचही जमीन विकली जाणार नाही’; तुकाराम मुंढेंकडे पुनरुज्जीवनाची जबाबदारी
मुंबई : १३५ वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे संस्थेच्या पुनर्बांधणीची जबाबदारी सोपविण्यात येईल, अशी घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेसच्या आमदार ज्योती गायकवाड यांनी हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाची सद्यस्थिती आणि त्याच्या संभाव्य खासगीकरणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. उपप्रश्नांमध्ये भाजपचे अतुल […]
