ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडणारा मोरिस 4 दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर, राऊतांच्या दाव्याने मोठी खळबळ

दहिसर ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर लाइव्ह गोळीबार करण्यात आला. त्यांच्यावर गुंड मोरिस नरोन्हा याने गोळ्या झाडल्या आणि यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी भाजप आमदाराने शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आल्याने महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

वंचित बहुजन आघाडीने मविआला दिलेल्या मसुद्यातील ‘ते’ 39 मुद्दे कोणते, सविस्तर जाणून घ्या!

मुंबई वंचित बहुजन आघाडी अद्याप मविआचा अधिकृत भाग झालेले नाही. मविआत सहभागी होण्यासंदर्भात वंचित उद्यापर्यंत मविआला मसुदा देणार आहे. यावर तिन्ही पक्षांची चर्चा होईल आणि यावर एकमत झाल्यानंतर मविआ पुढील रणनीती आखणार असल्याचं सांगितलं जात आहे. या मसूद्यात कोणत्या मुद्द्यांचा समावेश, जाणून घेऊया… 1) मराठ्यांचे आरक्षणाचे ताट आणि ओबीसी बांधवांचे आरक्षणाचे ताट वेगवेगळे असावे. अस्तित्वात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाकडून छापा

मुंबई मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. टॅक्स चोरी प्रकरणात अधिकाऱ्यांनी प्रदीप शर्मा यांच्या मुंबईतील घरावर छापा टाकला. या घटनेनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी आहेत. ते वर्षभरापासून अधिक काळ तुरुंगात होते. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘राज्यात माहितीच्या अधिकारातील 90 हजारावर अर्ज प्रलंबित, आपले सरकार पोर्टल म्हणजे गाजरच’ वडेट्टीवारांची सरकारवर सडकून टीका

मुंबई सरकारी यंत्रणा पारदर्शी असाव्यात, नागरिकांना सरकारी विभागांतील कामकाजांसंदर्भात माहिती मिळावी, यासाठी माहिती अधिकार कायदा, प्रभावी अस्त्र आहे. या कायद्यानुसार एका ठरावीक मुदतीत नागरिकांना माहिती मिळण्याचा हक्क आहे. पण राज्यात 20 हजार 744 इतके तक्रारींचे अर्ज प्रलंबित असून प्रलंबित द्वितीय अपिलांची संख्या 90 हजार 820 इतकी आहे. तर आपले सरकार या पोर्टलवर 93 टक्के तक्रारींचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

संजय राऊतांचा धडाका सुरूच, सलग तिसऱ्या दिवशी शिंदेंचा गुंडांसोबतचा फोटो शेअर

मुंबई संजय राऊतांचा धुमधडाका सुरूच असून आज तिसऱ्या दिवशी सलग त्यांनी फोटोबॉम्ब शेअर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गुंडासोबतचा फोटो ट्विट करीत पुन्हा एकनाथ शिंदेंना घेरण्यात आलं आहे. शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा. ठाणे पुणे परिसरात हत्या, अपहरण, सोन्याचांदीच्या दुकानांवर दरोडे, अशा दाखलेबाज गुन्ह्यात सहभागी असलेल्या या महाशयांचे स्वागत मुख्यमंत्री उत्साहाने करीत आहेत, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंकजा मुंडेंची राज्यसभेत वर्णी लागणार का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं…

मुंबई पंकजा मुंडेंची राज्यसभेत वर्णी लागणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आज स्पष्टच सांगितलं. येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या निवडणूक पार पडणार आहेत. यंदा महाराष्ट्रातील ६ खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिलला संपणार आहे. यामध्ये प्रकाश जावडेकर, नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, व्ही मुरलीधरन आणि वंदना चव्हाण यांचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

4 वर्षीय मुलीवर शाळेत बलात्कार प्रकरणात मनसे आक्रमक, कठोर कारवाईबाबतच्या सर्व मागण्या आयुक्तांकडून मान्य

मुंबई मुंबईतील कांदिवली पूर्व समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला आहे. लिटील कॅप्टन्स प्री स्कूलच्या सुरक्षा रक्षकाने मुलीला चॉकलेटच्या बहाण्याने बाथरूममध्ये नेत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर मनसेच्या विद्यार्थी सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात कठोर धोरण राबवण्याची मागणी केली […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कृषी विभागाच्या पुरस्काराच्या रकमेत चौपट वाढ, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबई राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्याकरिता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्करांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ते म्हणाले, शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये अतिउल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी वेळोवेळी कृषी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘दलालांकडून शेतकऱ्यांची लूट सुरूच; सोयाबीन पिकांची खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांना न्याय द्या’; वडेट्टीवारांची मागणी

मुंबई ‘सोयाबीनची खरेदी जागतिक बाजार पेठेवर आधारित असल्याचे सांगितले जात असले तरी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी केली जाऊ नये, असे अपेक्षित आहे. परंतू सोयाबीन असो की, इतर पीकांची खरेदी व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने केली जात आहे. पण पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे’, अशी परखड […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

माजी मंत्री बाबा सिद्दीकींचा काँग्रेसमधून राजीनामा; 48 वर्षांचा प्रवास अखेर थांबवला!

मुंबई लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी गुरुवारी (8 फेब्रुवारी) पक्षाचा राजीनामा दिला. बाबा सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहिली. तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो आणि माझ्यासाठी हा 48 वर्षांचा प्रवास महत्त्वाचा आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. […]