ताज्या बातम्या राष्ट्रीय

‘राम आग नाही…ऊर्जा आहे, राम वाद नाही, समाधान आहे’; अयोध्या मंदिर प्राण प्रतिष्ठेनंतर काय म्हणाले PM मोदी?

अयोध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत पूजा अर्चा करून श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. अयोध्येत सुरू असलेला तो सोहळा देशातील प्रत्येक व्यक्ती आपल्या डोळ्यात साठवत होता. 500 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज अखेर रामलल्ला अयोध्येत विराजमान झाले आहेत. देशभरात दिवाळीसारखं वातावरण आहे. घराघरात रामाचा जयघोष होत आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘आज कारसेवकांचे आत्मे सुखावले अन्…’; राम मंदिर प्राण प्रतिष्ठेनंतर राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत पूजा अर्चा करून श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी जय श्रीरामच्या घोषणाही सुरू होत्या. आपल्या लाडक्या दैवताचा हा प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा अवघ्या देशाने डोळेभरून पाहिला. महाराष्ट्रातही अनेक नेत्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या शुभेच्छा दिल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सोशल मीडियावरुन […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर प्राणप्रतिष्ठा विधीला सुरुवात; सरसंघचालकही शेजारी

अयोध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील राम मंदिरात दाखल झाले असून रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या विधीला सुरुवात झाली असून मोदींकडून गर्भगृहात विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी राम मंदिराच्या परिसरात मोठी गर्दी झाली आहे. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी गर्भगृहात दाखल झाले असून श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा विधीची सुरुवात झाली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींसह संघाचे सरसंघचालक मोहन भागवतही उपस्थित […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘आता सळो की पळो करून सोडणार…’ मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चाचा आज तिसरा दिवस

पुणे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी काढलेल्या मोर्चाचा आज तिसरा दिवस आहे. रविवारी सकाळी १० वाजता मातोरी गावातून निघालेले मनोज जरांगे पाटील रात्री उशिरा बराबाभळी येथे पोहोचले. आज बाराबाभळी ते रांजनगांव असा प्रवास करणार आहे. आज सकाळी ९ वाजता ते बाराबाभळीहून निळाले असून सुपा येथे दुपारचं भोजन करतील त्यानंतर रात्रीचा मुक्काम रांजणगाव येथे असणार […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

‘मोंदींच्या परवानगी शिवाय मंदिरात जाता येणार नाही का?’ राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखलं, काँग्रेसचा संताप

आसाम भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी आसाममध्ये आहेत. यावेळी येथील एका मंदिरात जाण्यापासून त्यांना रोखण्यात आलं. राहुल गांधींच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा आसाममधील नागांव जिल्ह्यात पोहोचली आहे. येथे बताद्रवा थान भागात वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांचं जन्मस्थळ आहे. राहुल गांधींना आज शंकरदेव मंदिरात जायचं होतं. मात्र त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं, याशिवाय भाजपच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

‘काळारामासमोरील ढोंगी रामभक्तांना आमचा थेट सवाल’; उद्धव ठाकरेंचं नाव न घेता आशिष शेलारांचा हल्लाबोल

मुंबई आज अयोध्येत राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा होणार असल्याने देशभरात आनंदाचं वातावरण आहे. घरोघरी पताके आणि लावले जात असून ठिकठिकाणी रामांचा जयघोष केला जात आहे. दरम्यान उद्धव ठाकरे आज नाशिकमधील काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे. त्यांच्या या दर्शनावरुन अनेक सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे. आता भाजप नेते आशिष शेलार यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘मंदिर तोडून बाबरी मशीद बांधली नाही, महात्मा गांधींनीही…’; राम मंदिरावर ओवैसींची वक्तव्य

मुंबई २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. देशात आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान एआयएमआय़चे खासदार असुद्दीदीन ओवैसे यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे. महात्मा गांधींनीही राम मंदिराचा उल्लेख केला नव्हता, असं त्यांनी म्हटलं आहे. काय म्हणाले ओवैसी?५०० वर्षांपासून मुस्लीम बाबरी मशिदीत नमाज पठण करत होते. काँग्रेसचे तेव्हाचे मुख्यमंत्री असलेले जी.बी पंत […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

‘जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात, लोकसभा निवडणूक एकजूटीने लढू’; काँग्रेसचा निर्धार

गडचिरोली देशासमोर धर्मांधशक्तींचे मोठे आव्हान असून आगामी निवडणुकीत या शक्तींचा ताकदीने सामना केला जाईल. जाती-धर्मात भांडणे लावण्याचे काम या मनुवादी शक्ती करत आहेत. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी देश जोडण्यासाठी तसेच सामाजिक सद्भाव वाढावा यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली व आता मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दिवशी राज्यात लोड शेडींग नाही – भाजप नेते संतोष गांगण

मुंबई प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा सोमवार दि २२जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण राज्यभर प्रचंड उत्साह व आनंदमय वातावरणात होत आहे. राज्यातील सर्व रामभक्तांनी शहर तथा खेडोपाड्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. तसेच सर्वच श्रीराम मंदिरांची तथा अन्य काही मंदिरांची रोषणाई करण्यात येणार आहे. अयोध्येतून प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी राज्यभरात राम भक्तांकडून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

NCP आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांसमोर आज सुनावणी

मुंबई राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर आज सुनावणी होणार आहे. आज सकाळी या सुनावणीला सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड आणि जयंती पाटील यांची फेरसाक्ष नोंदवली जाणार आहे. याशिवाय अजित पवार गटाकडून छगन भुजबळ आणि अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रतेसंदर्भात संविधानाच्या दहाव्या सूचीच्या अनुच्छेद २ अ […]