Marathwada agriculture agro-processing industry and rural technology editorial illustration महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठवाड्याच्या शेतीला उद्योगाची जोड देण्याचा प्रयत्न; ‘कृषी पर्व’ परिषद १७ सप्टेंबरला

शेतीवरील वाढता भार, कृषी प्रक्रिया उद्योग, मूल्यसाखळी, कार्बन बाजार आणि नवतंत्रज्ञानावर छत्रपती संभाजीनगरात राज्यस्तरीय मंथनछत्रपती संभाजीनगर : शेतीवर अवलंबून असलेल्या वाढत्या लोकसंख्येला मर्यादित जमीन किती काळ आधार देऊ शकेल, ग्रामीण भागात शेतीपूरक उद्योगांची निर्मिती कशी करता येईल आणि मराठवाड्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला प्रक्रिया उद्योग व मूल्यवर्धनाची जोड कशी देता येईल, या प्रश्नांवर केंद्रित ‘कृषी पर्व’ राज्यस्तरीय परिषद […]

चाकण MIDCमधील खराब रस्ते, खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक परिसराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उद्योग आकडेवारी आणि प्रत्यक्ष पायाभूत समस्यांतील विरोधाभास दर्शविणारे प्रतीकात्मक चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

३६ हजारांचा ‘आकड्यांचा खेळ’ की चाकणचा ‘खड्ड्यांतला उद्योग’…….?

वाजेंच्या संसद प्रश्नापासून पवारांच्या पाहणीपर्यंत उद्योग स्थलांतराचा मुद्दा तापला; मुख्यमंत्री फडणवीसांचा बचाव आकडेवारीवर, पण चाकणमधील २० उद्योगांच्या संभाव्य स्थलांतराचा प्रश्न कायम……! Anant Nalawade मुंबई — महाराष्ट्राच्या औद्योगिक आघाडीला आता आकडेवारीच्या कागदावर नव्हे, तर चाकणच्या रस्त्यांवरून कसोटीला उतरावे लागणार आहे….! त्याला कारणही तसेच आहे. महाराष्ट्रातील ३६,२११ खासगी कंपन्या गेल्या पाच आर्थिक वर्षांत liquidated, dissolved अथवा कंपनी रजिस्टरमधून struck off […]

महायुती सरकारमधील महामंडळ नियुक्त्या, सत्तासंतुलन आणि संभाव्य नव्या राजकीय समीकरणांचे प्रतीकात्मक संपादकीय चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

महामंडळ वाटपात ‘पवार फॅक्टर’चा प्रभाव…?

४८-२९-२२ फॉर्म्युला बदलणार? शरद पवार गटाच्या संभाव्य सत्ताप्रवेशाच्या चर्चेमुळे महायुतीचे नवे राजकीय गणित नियुक्त्या पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता मुंबई: महायुती सरकारमधील दीड वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या महामंडळांच्या राजकीय नियुक्त्या लवकरच जाहीर होतील, अशी चर्चा सुरू असतानाच राज्याच्या राजकारणातील नव्या घडामोडींमुळे ही प्रक्रिया पुन्हा विलंबित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, राष्ट्रवादी […]

Editorial illustration depicting Maharashtra’s changing political landscape, symbolising political realignment, opposition uncertainty and shifting alliances following Operation Tiger. महाराष्ट्र ताज्या बातम्या

सत्तेचे आकर्षण आणि बदलती राजकीय समीकरणे; पुन्हा एका राजकीय भूकंपाची चाहूल?

‘ऑपरेशन टायगर’नंतर विरोधी पक्षांमध्ये वाढली अस्वस्थता; महाविकास आघाडीसमोर संघटन टिकविण्याचे नवे आव्हान राजकारणात एक जुनी म्हण प्रचलित आहे—‘जल बिन मछली’ आणि सत्ता नसलेला राजकारणी फार काळ टिकत नाही. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींकडे पाहिले तर या म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा येताना दिसतो. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात सुरू झालेल्या नव्या राजकीय हालचाली, ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा आणि विरोधी पक्षांतील वाढती […]

मुंबई ताज्या बातम्या

BMC elections : असा असेल मुंबई महापालिकेचा निकाल; भाजप शंभरीकडे, शिंदे सेनेला अर्धशतक अवघड?

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीची (BMC Elections) प्रक्रिया सुरू झाली असली, तरी कोणते पक्ष कोणत्या युतीत असतील आणि कोण किती जागा लढवणार, याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सरकारी पातळीवरील अंतर्गत अहवालानुसार भारतीय जनता पक्ष (BJP) यावेळी शंभरी पार करण्याच्या स्थितीत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याउलट शिवसेना (एकनाथ शिंदे गट) (Shiv Sena) यांना ५० […]

मुंबई ताज्या बातम्या

BMC Elections :  मुंबईत काँग्रेससमोर उमेदवारांचा तुटवडा, ३० हून अधिक प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही

X: @vivekbhavsar मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (BMC elections) नामांकन प्रक्रिया सुरू झाली असली, तरी सुरुवातीलाच समोर आलेल्या अंतर्गत आकडेवारीमुळे मुंबईतील काँग्रेसच्या (Mumbai Congress) संघटनात्मक क्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. TheRajkaran (राजकारण) ला मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अनेक विधानसभा क्षेत्रांमध्ये (Assembly segment) काँग्रेसकडे अद्याप एकही इच्छुक उमेदवार पुढे आलेला नाही आणि काही ठिकाणी उमेदवारांचा शोध अजूनही सुरू […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Uddhav – Raj alliance : अखेर ठरले! महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र; सोबतीला कोणते ‘पवार’?

मुंबई: मुंबईसह राज्यातील सर्वच २९ महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्रित लढण्यावर अखेर दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये (Thackeray’s alliance) एकमत झाले आहे. अनेक दिवसांच्या राजकीय चर्चेनंतर, “घोडे गंगेत न्हाले” अशी स्थिती निर्माण झाली असून, या निर्णयाची अधिकृत घोषणा बुधवारी दुपारी १२ वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात करण्यात येणार आहे. या घोषणावेळी उद्धव ठाकरे (Udahav Thackeray) यांच्या शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अखेर व्हायचे ते झाले… शरद पवार ठाकरे बंधूंसोबत!

मुंबई– मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवायचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला आज स्पष्ट फटका बसला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण केंद्रातील बैठकीत थेट घोषणा करत आपला पक्ष उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेसोबत निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसने अलीकडेच ’मनसे नको’ अशी अट ठेवत महाविकास आघाडीचा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

विश्वासघाताचं राजकारण केल्यामुळे मतदारांनी शरद पवारांना हद्दपार केलं : आशिष शेलार यांचा हल्लाबोल

मुंबई: विश्वासघाताच्या राजकारणाचे जनक असलेल्या शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना आपला तोल गमावला आहे. विश्वासघाताचं आणि खंजीर खुपसण्याचं राजकारण आजवर केल्यामुळेच महाराष्ट्राच्या मतदारांनी तुम्हाला हद्दपार केलं, असा घणाघाती हल्ला मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी चढवला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शेलार बोलत […]

महाराष्ट्र

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांवर मोठी जबाबदारी सोपवण्याचे शरद पवार यांचे संकेत 

इंदापूर (पुणे): निवडणुकीत मला स्वत:ला उभं राहायचं नाही. जनतेने मला 14 वेळा निवडून दिले. त्यातल्या सात वेळा इंदापूर तालुक्यातील जनतेने मला मतं दिली. त्यामुळे आता मला स्वत:साठी काहीच मागायच नाही. मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेचे जीवन बदलायचं आहे. हे करायचं असेल, तर ज्यांच्याकडे कर्तृत्व, अनुभव, प्रशासन आहे अशाही लोकांची गरज आहे. त्याची पूर्तता […]