सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची लूट! पनवेल–महाड मार्गावर खाजगी वाहनांकडून ₹700 पर्यंत वसुली
महाड : मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे मुंबई आणि पनवेलहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली असून एसटी बस हाउसफुल धावत आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा घेत विनापरवाना खाजगी वाहन चालकांकडून प्रवाशांची उघड लूट सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. पनवेल ते महाड प्रवासासाठी प्रति प्रवासी ₹500 ते ₹700 पर्यंत दर आकारले जात असून, अनेक वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून वाहतूक […]
