क्रीडा खात्यातील वादग्रस्त निविदा अखेर शासनाकडून रद्द, राष्ट्रवादीचे सुनील माने यांच्या पाठपुराव्याला यश
पुणे: राज्याच्या क्रीडा खात्याने व्यायामशाळा आणि क्रीडा साहित्य खरेदीसाठी तीन वर्षांसाठी काढलेली ६९० कोटी रुपयांची वादग्रस्त निविदा अखेर रद्द करण्यात आली आहे. यासंदर्भात नवीन निविदा क्रीडा खात्याने १७ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी या निविदेतील संभाव्य भ्रष्टाचार उघडकीस आणत ती रद्द करण्याची मागणी केली होती. […]