महाराष्ट्र

विधानसभा निवडणूकीत तळकोकणातून काँग्रेसचा सुपडा साफ होणार? एकही जागा लढणे अशक्य!

@milindmane70 मुंबई: येत्या विधानसभा निवडणुकीत (assembly elections) कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील 15 पैकी एकही जागा काँग्रेसला (Congress) मिळण्याची सुतराम शक्यता नाही. कोकणात (Konkan) काँग्रेसने फक्त राष्ट्रवादी (शरद पवार) (NCP-SP) व शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) (UBT Shiv Sena) व्यासपीठावर जाऊन भाषणे करण्यापलीकडे कोकणातील काँग्रेसच्या नेत्यांना दुसरे कोणतेही काम शिल्लक राहणार नसल्याचे स्पष्ट […]

महाराष्ट्र

उद्धव सेनेला कोंडीत पकडण्यासाठी दसऱ्या आधीच निवडणूक आचारसंहिता?

X: @vivekbhavsar मुंबई: दादरचे शिवाजी पार्क मैदान (Dadar Shivaji Park) आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे घट्ट असलेलं समीकरण शिवसैनिकांमध्ये वर्षानुवर्षे चैतन्य फुलवणारे ठरले आहे. याच शिवाजी पार्कच्या मैदानातून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी केलेल्या गर्जनेमुळे महाराष्ट्रात सत्तांतर झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) तोंडावर होणारा हा दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आणि […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahayuti : महायुतीचे 80 टक्के जागा वाटप निश्चित;  भाजप 160 जागा लढवणार!

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार निवडणूक  नागपूर :  राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी माहिती पुढे आलीय. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक होणार असून त्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे (महायुती) 80 टक्के जागावाटप निश्चात झाले आहे. उर्वरित जागांबाबत 3 ऑक्टोबरपर्यंत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.   देशातील जम्मू-काश्मीर, हरियाणासोबतच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होईल अशी शक्यता […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sena on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा पीए पैसे घेऊन पद विकतो!

शिंदेसेना – भाजपचे गंभीर आरोप X : @therajkaran मुंबई – विधानसभा निवडणूक (Assembly polls) जसजशी जवळ येत आहे, तसतसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (UBT Sena) आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे काळे कारनामे बाहेर येत आहेत. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Shiv Sena MLA Sanjay Shirsat) यांच्यासह माजी खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम (Sanjay Nirupam) आणि भाजप नेते आशिष […]

विश्लेषण महाराष्ट्र

महाराष्ट्राची सामाजिक घडी विस्कटली!

X : @vivekbhavsar गेल्या आठवड्यात एक डॉक्टर भेटले. मूळचे परभणीचे, माळी समाजाचे. राज्यातील लोकसभा निवडणूक निकालावर बोलताना त्यांनी एक अनुभव सांगितला आणि खंत व्यक्त केली. बालपणापासूनच तिघे मित्र, त्यातील दोघे मराठा समाजाचे. एकत्रच लहानाचे मोठे झालेले, घराच्या छतावर एकत्र बसून पार्टी करणारे, गप्पात एकमेकाची टिंगल करणारे हे मित्र. त्यातील एकाने व्हॉट्सअँप स्टेटस् ठेवलेलं. हा डॉक्टर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

विनायक राऊत, रेडी पोर्ट व मायनिंगचे लाभार्थी

भाजपचे प्रदेश सचिव डॉ निलेश राणे यांचा गंभीर आरोप X: @ajaaysaroj मुंबई: रेडी पोर्ट आणि मायनिंग या दोन्ही प्रकल्पात, महाविकास आघाडी उबाठा गटाचे सिंधुदुर्ग – रत्नागिरीचे उमेदवार विनायक राऊत यांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार केला असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव, माजी खासदार डॉ निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला. या आरोपांच्या पुष्ट्यर्थ त्यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

रवींद्र वायकर यांचे नाव भारतीय कामगार सेनेच्या बोर्डावरुन मिटवले

X: @therajkaran मुंबई: शिवसेना आमदार रवींद्र वायकर शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी चांगलेच संतापले आहेत. ज्या सेनेतून मोठे झाले त्याच सेनेला विसरून गट बदलत असल्याची प्रतिक्रिया सामान्य शिवसैनिक व्यक्त करत आहेत. वायकर हे जोगेश्वरी मतदार संघातील असल्याने त्याच मतदारसंघात येणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयातील भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगार […]

ताज्या बातम्या विश्लेषण

खाजगी सर्वेक्षणाचा अहवाल; बंडखोर शिंदे गटातील आमदारांना जनता नाकारेल?

Twitter : @milindmane70 मुंबई राज्यात लोकसभा निवडणुकीबरोबरच राज्य विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर मतदारसंघातील जनता कोणाच्या बरोबर असेल याची चिंता शिंदे गटातील आमदारांना लागली आहे. शिंदे गटातील बहुतांशी आमदारांकडून मतदारसंघात खाजगी संस्थांकडून केलेल्या सर्वेक्षणात या बंडखोर आमदारांना जनतेने कौल नाकारल्यानचे निकाल येत असल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये कमालीचे नैराश्य आले असून या चिंतेने शिंदे गटातील आमदारांना ग्रासले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला उद्धव सेनेला निमंत्रणच नाही

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी नोंदवला आक्षेप Twitter: @NalavadeAnant मुंबई: मराठा आरक्षणाच्या कळीच्या मुद्यावर राज्य सरकारने सोमवारी सर्वपक्षीय विशेष बैठक बोलावली. मात्र त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेना उबाठा पक्षाला देण्यात आले नसल्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांकडे तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या बैठकीला अनेक छोट्या मोठ्या पक्षांना निमंत्रण दिले आहे. अगदी आर पी […]

अपात्रता सुनवाई : शिवसेनेच्या 16 आमदारांमध्ये अस्वस्थता

Twitter : @milindmane70 मुंबई महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे 14 सप्टेंबरपासून शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणी सुरू करणार असल्यामुळे शिवसेनेच्या बंडखोर 16 आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. मतदारसंघ सोडून दोन दिवस आधीच अनेक आमदारांनी मुंबईकडे धाव घेण्यास सुरुवात केली असल्याने येत्या आठ दिवसात राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात दुपारी बारा […]