शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करूनच पवना जलवाहिनी प्रकल्प राबविणार; २०५० पर्यंतच्या जलआराखड्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पुणे-पिंपरी चिंचवडच्या भविष्यातील पाणीगरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजनावर भर मुंबई : पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेशातील वाढत्या पाणीगरजा लक्षात घेऊन राज्य सरकारने पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्पाबाबत महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांची संमती, विश्वास आणि संवादाशिवाय हा प्रकल्प पुढे नेला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. याचबरोबर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या २०५० पर्यंतच्या पाणीपुरवठ्याचा सर्वसमावेशक […]

