मुंबई ताज्या बातम्या

वसई-विरारमध्ये ९०% इमारतींना OC नाही; विधानसभेत भ्रष्टाचाराचा आरोप, SIT चौकशीची मागणी  

Maharashtra MoS Madhuri Misal replying in Assembly on Vasai-Virar buildings OC issue

मुंबई : वसई-विरार महानगरपालिकेच्या हद्दीत बांधकाम पूर्ण होऊन ‘सीसी’ (Completion Certificate) मिळालेल्या सुमारे ९० टक्के इमारतींना अद्याप भोगवटा प्रमाणपत्र (OC) मिळालेले नसल्याचा गंभीर मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. महापालिका आयुक्त, म्हाडा अधिकारी आणि विकासक यांच्या कथित भ्रष्टाचारामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला. मुख्यमंत्री आदेश देऊनही कारवाई होत नसल्याचे सांगत या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडताना केली.

भाजपच्या श्रीमती स्नेहा दुबे यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली. त्यांनी सांगितले की, वसई-विरार महापालिकेच्या कार्यालयात निर्णय न घेता बाहेर बैठका घेऊन निर्णय घेतले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच या भागातील रहिवाशांना पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न भेडसावत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या ‘अभय योजना’च्या धर्तीवर वसई-विरार महानगरपालिका हद्दीतही अशी योजना लागू करून रहिवाशांना दिलासा देण्यात येणार का, अशी मागणीही त्यांनी केली.

यावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, वसई-विरारमध्ये सुमारे ५० टक्के इमारतींना अद्याप ओसी मिळालेली नाही, हे शासनाच्या निदर्शनास आले आहे. विकासकांना दंड भरावा लागेल या भीतीने अनेकजण ओसीसाठी अर्ज करत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणाची विभागीय आयुक्तांकडून चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच वसई-विरारमध्ये ‘अभय योजना’ लागू करण्यास शासन अनुकूल असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

1 Comment

  1. zoritoler imol

    March 9, 2026

    Enjoyed looking through this, very good stuff, regards. “It requires more courage to suffer than to die.” by Napoleon Bonaparte.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज