मुंबई

अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर प्रभादेवीत २०० झाडांची हिरवाई

मटकर मार्गावर वृक्षारोपण; पर्यावरणपूरकतेसह परिसराचे सौंदर्यही वृद्धिंगत

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रभादेवीतील मटकर मार्गावरील ३९ अनधिकृत बांधकामे हटवून त्या जागेवर २०० हून अधिक झाडे लावली आहेत. ही कारवाई अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

अतिक्रमण निर्मूलनानंतर ही मोकळी जागा रस्ता रुंदीकरणासाठी वापरण्यात आली, तसेच पर्यावरणपूरक दृष्टिकोन ठेवत येथे शास्त्रशुद्ध पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले. उद्यान विभागाच्या सहकार्याने सुपारी, अरेका पाम, ड्रेसिना, मुसांडा, पेडीलॅन्थस, टॅबरनामोंटाना, ॲकालीफा, लॅनटेना आदी झाडांची लागवड करण्यात आली आहे. अरेका पाम झाडे हवेतील प्रदूषके शोषून घेतात आणि फुलपाखरांना आकर्षित करतात.

वृक्षारोपणासोबतच मटकर मार्गालगत २ मीटर रुंदीचा काँक्रीट पदपथ बांधण्यात आला आहे, त्यामुळे पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि हरित मार्ग उपलब्ध झाला आहे.

पालिकेच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे स्थानिक नागरिक आणि पर्यावरण अभ्यासकांनी स्वागत केले आहे. ‘जी दक्षिण’ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही हिरवाई परिसराच्या सौंदर्यात भर घालण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
मुंबई

उद्धव सेनेच्या मुंबईतील राजकीय ताकदीपुढे भाजपची शरणागती: सिनेट निवडणूक पुढे ढकलली

Twitter : @vivekbhavsar मुंबई : शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केल्यानंतर देखील मुंबईत शिवसेनेचा पराभव