दोन्ही सेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन
महाड: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. महाड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ५ गटांसाठी एकूण २५ तर पंचायत समितीच्या १० गणांसाठी ४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी होणार असून, ७ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महाड प्रांत कार्यालयासमोर मोठी गर्दी उसळली होती.
या प्रक्रियेत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यापूर्वी मंगळवारी शिवसेना शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.
आज बुधवारी माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. मात्र उबाठा पक्षाकडून मोठ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आले, याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत महाड तालुक्यात
- जिल्हा परिषदेचे ५ गट
- पंचायत समितीचे १० गण
यासाठी मतदान होणार असून, आज सर्व पक्षांकडून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
जिल्हा परिषद गटानिहाय अर्ज
- बिरवाडी – ४
- खरवली – ४
- नडगाव तर्फे बिरवाडी – ६
- दासगाव – ३
- करंजाडी – ८
एकूण – २५ अर्ज
पंचायत समिती गणनिहाय अर्ज
- धामणे – ३
- बिरवाडी – ३
- वरंध – ७
- खरवली – ४
- नडगाव तर्फे बिरवाडी – ४
- नाते – ५
- दासगाव – ३
- अप्पडतुडी – ४
- करंजाडी – ५
- विन्हेरे – ५
एकूण – ४३ अर्ज
उबाठाकडून शक्तीप्रदर्शन
आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
विन्हेरे विभागातून
- सोमनाथ ओझर्डे
यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेले विन्हेरे गावचे उपसरपंच चंद्रकांत मोरे यांच्या पत्नी
- सुषमा चंद्रकांत मोरे
यांनी विन्हेरे पंचायत समिती गणातून प्रचंड कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

