महाराष्ट्र ताज्या बातम्या

ग्रंथ आणि ग्रंथालये हाच विजय वैद्य यांचा श्वास: योगेश त्रिवेदी

मुंबई : ग्रंथ आणि ग्रंथालये हा विजय वैद्य यांचा श्वास होता.सर्वत्र ग्रंथालये उघडावीत हा त्यांचा ध्यास होता. मंत्रालयातील पत्रकार कक्षात त्यांच्या नावाने संदर्भ ग्रंथालय सुरू होऊन ते चांगल्या प्रकारे कार्यान्वित होणे या माध्यमातून त्यांची स्मृती चिरंतन राहील, अशा शब्दांत ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांनी ज्येष्ठ पत्रकार कै. विजय वैद्य यांना आदरांजली वाहिली.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष कै. विजय वैद्य यांच्या जयंतीचे औचित्य साधून संघाच्या पत्रकार कक्षात सुरु करण्यात आलेल्या कै. विजय वैद्य संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन योगेश त्रिवेदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे हे होते. पत्रकार कक्षात संदर्भ ग्रंथालय सुरू करण्यासाठी अशोक शिंदे, नासिकेत पानसरे आणि प्रितम नाचणकर यांनी अथक मेहनत घेतली. हे तीनही या बाबतीत वैद्य यांचे मानसपुत्र म्हणावे लागतील, असेही त्रिवेदी यांनी सांगितले महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात कार्यरत असलेले विजय वैद्य यांचे चिरंजीव विक्रांत विजय वैद्य हेही यावेळी आवर्जून उपस्थित होते. नव्या पिढीतील पत्रकारांनी विविध संदर्भ ग्रंथ अभ्यासले पाहिजेत, वस्तुनिष्ठ पत्रकारिता करण्यासाठी त्याचा त्यांना नक्कीच उपयोग होईल आणि असे संदर्भ ग्रंथांचे संकलन करून वाचनालयांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा विजय वैद्य यांच्या कार्याला आदरांजली ठरेल, असेही योगेश त्रिवेदी यांनी सांगितले.

पत्रकार कक्षात झालेल्या या कार्यक्रमास संघाचे सदस्य आणि मान्यवर मंडळी उपस्थित होती. या संदर्भ ग्रंथालयात अनेक प्रकारचे जवळपास १२०० ग्रंथ आहेत. विक्रांत वैद्य यांनी विधिमंडळ कामकाजातील नोंदी तसेच त्या संबंधित ग्रंथसंपदा ग्रंथालयात अधिक प्रमाणावर वृद्धिंगत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली तर ज्येष्ठ पत्रकार सदानंद खोपकर यांनी विजय वैद्य यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला तसेच पत्रकारांनी एक क्षण तरी विजय वैद्य होण्याचा प्रयत्न करावा, पत्रकारितेतील आदर्श आजच्या पिढीने घेण्याची आवश्यकता विशद केली. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी ग्रंथालय आधुनिक काळाशी सुसंगत करण्यासाठी तसेच ग्रंथसंपदा वाढविण्याचे प्रयत्न संघाच्यावतीने भविष्यात केले जातील, याची ग्वाही त्यांनी दिली. आभार संघाचे कार्यकारिणी सदस्य खंडूराज गायकवाड यांनी मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले. यावेळी संघाचे उपाध्यक्ष महेश पवार, ज्येष्ठ पत्रकार सुयश पडते, विनया पंडित-देशपांडे, दीपक कैतके, अशोक अडसूळ आदी मान्यवर पत्रकार मंडळी देखील उपस्थित होती.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात