मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. “पन्नास खोके, एकदम ओके”, “चड्डी बनियन गँग हाय हाय”, “महाराष्ट्राला लुटणाऱ्यांचा धिक्कार असो”, अशा घोषणा देत मविआ आमदारांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
दानवे म्हणाले, “राज्यात सध्या लुटारू आणि दरोडेखोर ‘चड्डी बनियन गँग’ सक्रीय आहे. विविध कंत्राटांमधून जनतेच्या हक्काच्या पैशांवर दरोडे टाकले जात आहेत. सामान्य माणसाला मारहाण केली जाते आणि अंधश्रद्धा पसरवणारे होमहवन घडवले जात आहेत.”
याचा निषेध करण्यासाठी आम्ही विधानभवन पायऱ्यांवर आंदोलन केल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.